विदर्भातील पेरकी समाजः
विदर्भातला पेरकी समाज बहुतांशी ग्रामीण भागात वसलेला आहे. सद्या नागपूर-कामठी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सारख्या शहरात वसलेला समाजही पूर्वी खेडे गावातच होता. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी त्याचे स्थलांतरण होत असल्याचे दिसते. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, झरी, वणी या तालुक्यातील विशेषतः पैनगंगा नदीच्या काठावरील जी गावे आहेत. ती आंध्र सरहदीवरील गावे स्थलातंरित म्हणण्यापेक्षा ते तिथे पूर्वी पासूनच असावे असे वाटत कारण भाषा, चालीरिती एकूणच त्यांचे लोकव्यवहार हे सीमावर्ती दोन्ही भागातील सारखेच वाटतात. पण या दोन तालुक्याच्या पुढे विशेषतः राळेगाव तहसीलीतील पेरका सावंगी, वालधूर, कोपरी, अंतरगाव, वरध ही गावे आता पूर्णपणे मराठी संस्कृतीच्या अधिपत्त्याखाली आहे. तेव्हा नेमका हा समाज कुठून स्थलांतरीत झाला असा प्रश्न पडतो. याची मी चौकशी केली. अनेकांना प्रश्न विचारले. त्यांच्या नातेवाईकाबद्दल चौकशी केली यातून त्यांच्या स्थलांतरणा बद्दल काही प्रकाश पडतो. उदा. अंकतवार यांचे नातेवाईक हे तेलंगणातील पार्डी या गावात राहतात त्यांचे कडून कळले की, यांचे पूर्वज तिकडेच होते. आणि श्री रामकृष्ण अंकतवाराच्या वडिलांचे नावही आशन्ना हे पूर्णतः आंध्र वळणाचेच आहे. म्हणून सावंगी पेरका ह्या गावातील पेरकी हे आंध्रमधूनच इकडे स्थलांतरित होण्याचीच शक्यता अधिक वाटते. या गावाला पेरका हे संबोधन लागण्यामागेही असेच कारण असावे. एखादा ग्रुप एकाच वेळी येऊन इथे थांबला असेल. त्यावरुन पेरकी राहणारा गाव म्हणून पेरका सांवगी किंवा पेरकी राहतात ती सावंगी म्हणून पेरका सावंगी असे म्हटल्या जाते तेलुगूत सावंगी ला सांगी असे म्हणतात. आणखी एक म्हणजे, इथले बंडेवार हे सावंगीवरुन नागपूरला गेल्याचे समजले, पण या स्थलांतरामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात येते. कामठीवरुन अंतरगाव येथे एम्बडवार घराण्याचे स्थलांतरण झाल्याचे कळले नानाभाऊचे आजोबा त्याकाळात कामठीवरुन अंतरगावला येऊन स्थायीक झाले, त्यांचे नाव बालन्ना हुशन्ना एम्बडवार, ते अत्यंत हुशार आणि व्यवहारदक्ष होते. कामठीवरुन त्यांनी काहीही न आणता स्वकर्तृत्वाने सारे मिळवले, लोकांच्यासाठी कोर्टकचेरी पर्यंत पांढरकवड्याहून घोडयावरुन रपेट करणारा घनदाट जंगलातून निर्भयपणे फिरणारा माणूस. भिती कसली हे त्यांना माहितच नव्हते शरीराने जसे भरदार तसे मनाने कणखर असे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या काळात पेरका जातीचे कार्यक्रम होत असल्याचे एक छापील पत्रक मिळाले, त्यावरुन त्यांच्या काळात पेरकी समाज जागृतीचे काम त्यांनीही केल्याचे दिसते. सावंगी पेरका इथूनच मग वालधूर, वरध इत्यादी ठिकाणी पेरक्यांचे स्थलांतरण झाले असण्याची शक्यता अधिक आहे. मात्र आंध्रमधून स्थलांतरित होऊन कामठी येथे आल्याचे दिसते. मुंबई येथील पेरकी आणि कामठी-नागपूर येथील पेरक्यांच्या स्थलांतरणात बरेच साम्य दिसते. पेरकी लोक म्हणजे एक विश्वासू कामगार म्हणून त्या काळात (इंग्रजाच्या अमदाणीत) आपल्या उपजीविकेसाठी स्थलांतरित झालेले हे लोक आपल्या कामात अत्यंत प्रामाणिक होते.
Donec purus nibh, commodo ac pellentesque quis, vehicula ut leo. Suspendisse potenti. Sed rhoncus est ac arcu malesuada bibendum. Cras ut nisi id lacus aliquam sodales
Our Team

Peter Jobs
CEO and Founder
Aliquam aliquam consequat laoreet. Proin eu magna et odio facilisis viverra vitae et dolor. Fusce enim elit, pulvinar at vestibulum faucibus, eleifend sit amet massa.

Kimberly Spenzer
Susan Cambler
Aliquam aliquam consequat laoreet. Proin eu magna et odio facilisis viverra vitae et dolor. Fusce enim elit, pulvinar at vestibulum faucibus, eleifend sit amet massa.

Lucenzo Di Michele
Developer and Support
Aliquam aliquam consequat laoreet. Proin eu magna et odio facilisis viverra vitae et dolor. Fusce enim elit, pulvinar at vestibulum faucibus, eleifend sit amet massa.

Kimberly Spenzer
Ads and Promo
Aliquam aliquam consequat laoreet. Proin eu magna et odio facilisis viverra vitae et dolor. Fusce enim elit, pulvinar at vestibulum faucibus, eleifend sit amet massa.

Kimberly Spenzer
HR
Aliquam aliquam consequat laoreet. Proin eu magna et odio facilisis viverra vitae et dolor. Fusce enim elit, pulvinar at vestibulum faucibus, eleifend sit amet massa.

Peter Jobs
Sales Manager
Aliquam aliquam consequat laoreet. Proin eu magna et odio facilisis viverra vitae et dolor. Fusce enim elit, pulvinar at vestibulum faucibus, eleifend sit amet massa.