Perki Samaj Educational Guidance 13 July 2025
- Perki Samaj
- 451
विदर्भातला पेरकी समाज बहुतांशी ग्रामीण भागात वसलेला आहे. सद्या नागपूर-कामठी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सारख्या शहरात वसलेला समाजही पूर्वी खेडे गावातच होता. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी त्याचे स्थलांतरण होत असल्याचे दिसते. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, झरी, वणी या तालुक्यातील विशेषतः पैनगंगा नदीच्या काठावरील जी गावे आहेत. ती आंध्र सरहदीवरील गावे स्थलातंरित म्हणण्यापेक्षा ते तिथे पूर्वी पासूनच असावे असे वाटत कारण भाषा, चालीरिती एकूणच त्यांचे लोकव्यवहार हे सीमावर्ती दोन्ही भागातील सारखेच वाटतात. पण या दोन तालुक्याच्या पुढे विशेषतः राळेगाव तहसीलीतील पेरका सावंगी, वालधूर, कोपरी, अंतरगाव, वरध ही गावे आता पूर्णपणे मराठी संस्कृतीच्या अधिपत्त्याखाली आहे. तेव्हा नेमका हा समाज कुठून स्थलांतरीत झाला असा प्रश्न पडतो. याची मी चौकशी केली. अनेकांना प्रश्न विचारले. त्यांच्या नातेवाईकाबद्दल चौकशी केली यातून त्यांच्या स्थलांतरणा बद्दल काही प्रकाश पडतो. उदा. अंकतवार यांचे नातेवाईक हे तेलंगणातील पार्डी या गावात राहतात त्यांचे कडून कळले की, यांचे पूर्वज तिकडेच होते. आणि श्री रामकृष्ण अंकतवाराच्या वडिलांचे नावही आशन्ना हे पूर्णतः आंध्र वळणाचेच आहे. म्हणून सावंगी पेरका ह्या गावातील पेरकी हे आंध्रमधूनच इकडे स्थलांतरित होण्याचीच शक्यता अधिक वाटते.